राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. "याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांसाठी वाईट वाटतं," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.